अल्पवयीन गुन्हेगारीत १५ टक्क्यांनी वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2014

अल्पवयीन गुन्हेगारीत १५ टक्क्यांनी वाढ

मुंबई : मुंबईमध्ये १८ वयापेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २0१३ च्या ऑक्टोबर महिन्याअखेर ही संख्या ८0२ इतकी होती. ज्यामध्ये बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग, खोल जखम, चोरी, घरफोडी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे असे दोनहून अधिक गुन्हे दररोज नोंद होत असून अल्पवयीन गुन्हेगारीत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे अल्पवयीन गुन्हेगारीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली होती. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त भगवान चाटे यांनी २0११ ते ऑक्टोबर २0१३ या तीन वर्षांची माहिती दिली आहे. २३ विविध गुन्ह्यांअंतर्गत २0११ मध्ये ७६६, २0१२ मध्ये ७00 तर जानेवारी ते ऑक्टोबर २0१३ पर्यंत ८0२ अल्पवयीन गुन्हेगारांविरोधात गुन्हे दाखल केले गेले आहेत. महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमधील बलात्कारामध्ये सुद्धा अल्पवयीन गुन्हेगाराला अटक झाली होती. २0११ मध्ये २६, २0१२ मध्ये ११ तर जानेवारी ते ऑक्टोबर २0१३ पर्यंत २८ अल्पवयीन गुन्हेगारांना बलात्कारामध्ये अटक करण्यात आली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात २0११ मध्ये २६, २0१२ मध्ये २३ तर जानेवारी ते ऑक्टोबर २0१३ पर्यंत ४५ अल्पवयीन गुन्हेगारांना गजाआड केले आहे.

लैंगिक शोषण करण्यातसुद्धा अल्पवयीन गुन्हेगारांनी आघाडी घेतली आहे. २0११ आणि २0१२ मध्ये अनुक्रमे २ आणि १ तर २0१३ च्या जानेवारी ते ऑक्टोबर या काळात १0 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २0१३ च्या जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान २३९ खोल जखम, १७९ चोरी, ८१ घरफोडी, प्रत्येकी १२-१२ खून आणि खुनाचा प्रयत्न, अपहरण १५, दंगल २६ आणि ९३ अन्य आयपीसीसारख्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS