मुंबई : गोव्याला पर्यटनासाठी जाणार्यांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-मडगाव मार्गावर प्रतीक्षेत असणारी डबलडेकर एसी एक्स्प्रेस लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. डबलडेकर एक्स्प्रेस सुरू होण्यामागील तांत्रिक, सुरक्षाविषयक मुद्दय़ांतून मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच 'मुंबई टू गोवा' एसी डबल एक्स्प्रेसने जाता येईल.
सीएसटी ते मडगाव डबलडेकर एसी एक्स्प्रेस अशी मूळ योजना आहे. मात्र, त्यात काहीअंशी बदल करण्यात आला आहे. सीएसटीवरील वर्दळ पाहता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सोडण्याचा पर्याय खुला आहे. संपूर्णत: एसी असणार्या एक्स्प्रेसच्या सुरक्षा चाचणीवरून प्रश्न उपस्थित राहिला होता. ठाण्याजवळील पारसिकप्रमाणेच भायखळ्यातील जुन्या पुलाखालून डबलडेकर एक्स्प्रेस जाण्यात तांत्रिक अडचणी येण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यामधील त्रुटी दूर झाल्या असून सुरक्षाविषयक काहीही मुद्दे राहिलेले नाहीत. या मार्गावर ओव्हरब्रिजविषयक काही मुद्दे असून त्यावर मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकार्याने दिली.


No comments:
Post a Comment