एसी बसमधून नगरसेवकांना मोफत प्रवास - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2014

एसी बसमधून नगरसेवकांना मोफत प्रवास

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना बेस्टच्या सर्वसाधारण बसेस प्रमाणेच आता लवकर एसी बसमधूनही मोफत प्रवास करता येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली.

या मोफत एसी बस प्रवासाचा लाभ २२७ नगरसेवक, ५ नामनिर्देशित सदस्य, बेस्ट समिती, शिक्षण समिती या वैधानिक समितीतील नियुक्त करण्यात आलेले बिगर पालिका सदस्यांना होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता याला बहुमताने मंजुरी मिळाली. १७ मार्च १९५0 रोजी पालिकेच्या नगरसेवकांना बेस्ट बसमधून मोफत प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली होती. बेस्टच्या एसी बसमधूनही नगरसेवकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे सदस्य अरुण दुधवडकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ४ जून २0१३ रोजी केली होती. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांवरील अध्यक्ष यांच्याकडे पालिकेच्या, तर काही नगरसेवकांकडे स्वत:च्या गाड्या आहेत. त्यामुळे एसी बसमधून मोफत प्रवास करण्याचा लाभ नेमका किती नगरसेवकांना मिळणार हा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS