मध्य रेल्वेवर फक्त १८ रूग्णवाहिका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2014

मध्य रेल्वेवर फक्त १८ रूग्णवाहिका

मुंबई : रेल्वे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडून मिळणार्‍या रुग्णवाहिका सेवेत मध्य रेल्वेची उपेक्षा झाल्याचे निदर्शनास येत आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवांतर्गत राज्यभरात ९३७ पैकी मध्य रेल्वेला केवळ १८ रुग्णवाहिका पुरवण्यात येणार आहेत. हार्बर, ट्रान्सहार्बर आणि ठाणे-खोपोली मार्गातील एकाही स्टेशनचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही.

राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि बॉम्बे व्हिक्टोरिया गांधी संस्थेतर्फे संयुक्तरीत्या राज्य स्तरावर रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात येणार आहे. या ९३७ रुग्णवाहिकांपैकी पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारसाठी २८, तर मध्य रेल्वेवर सीएसटी ते मुलुंडपर्यंत १८ रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. उपनगरीय मार्गावर अपघातग्रस्त जखमी प्रवाशांना या रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेवर सीएसटी ते मुलुंड या मार्गावर १८ रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे पत्र प्रशासनास मिळाले आहे. मात्र त्यात मुलुंडपुढील म्हणजे ठाणे ते कल्याण, कर्जत-कसारा, खोपोलीपर्यंतच्या एकाही स्टेशन्सचा समावेश नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS