मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई महापालिकेच्या ९४२ लिपिकांच्या रिक्त पदांसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या 'ऑनलाइन' परीक्षेच्या वेळी ठाण्यातील चार-पाच आणि मुंबईतील दोनतीन केंद्रांवरील 'सर्व्हर' अचानक 'डाऊन' झाल्याने आणि परीक्षेसाठी वापरण्यात येणार्या 'शिवाजी' फाँटऐवजी 'आकृती'हा फाँटचा वापर झाल्यामुळे शेकडो उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. यामुळे विद्यार्थी कमालीचे संतापले होते, तर कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील केंद्रावर या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी पालिकेचा एकही अधिकारी आणि ही परीक्षा घेण्यासाठी पालिकने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांचा एकही प्रतिनिधी न आल्यामुळे बर्याच विद्यार्थ्यांनी स्थानिक पोलिसांत यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे.
पालिकेच्या विविध विभागांमध्ये लिपिकांच्या ९४२ रिक्त पदांसाठी शुक्रवारी मुंबईसह ठाण्यातील काही केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा आणि टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी होणार होती; पण परीक्षा सुरू असताना ठाण्यातील आणि मुंबईतील काही केंद्रांवरील सर्व्हर अचानक बिघडला आणि या केंद्रांवरील परीक्षेचा पार बोर्या वाजला. कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयातील काही उमेदवारांनी या गोंधळाबद्दल माहिती देताना सांगितले, सकाळी ८ ते १0 या वेळेत ठाकूर महाविद्यालय आणि अंधेरी येथील चाणक्य इन्स्टिट्यूट येथे ऑनलाइन परीक्षा सुरू असतानाच सर्व्हर यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. उमेदवारांनी परीक्षेसाठी 'शिवाजी' फाँट वापरावा, अशा सूचना दिल्या होत्या पण त्याऐवजी 'आकृती' फाँटच्या वापरल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
'शिवाजी'मध्ये इंग्रजी शब्द टाईप केल्यानंतर संगणकावर त्याचे मराठी शब्द उमटतात; पण 'आकृती'मुळे त्यांना परीक्षा देता येत नसल्याने त्यांनी संबंधित संस्थांच्या पर्यवेक्षकांकडे याबद्दल तक्रार केली. मात्र, या पर्यवेक्षकांनी त्यांना योग्य सल्ला न दिल्यामुळे उमेदवारांची बिकट अवस्था झाली. पर्यवेक्षक सल्ला देण्यास असर्मथ ठरल्याने उमेदवारांनी पालिकेच्या अधिकार्यांविषयी तसेच ही परीक्षा घेणार्या संस्थेच्या प्रतिनिधींबद्दल चौकशी केली, तर काही परीक्षार्थींनी पालिका मुख्यालयाशी संपर्क साधला; पण त्यांना कोणाही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. जेथे सर्व्हर बंद पडले होते, तेथील उमेदवारांनी किमान तीन-चार तास असाहाय्य अवस्थेत काढले. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बरेच उमेदवार परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते.
कांदिवली येथील तीन-चार केंद्र पालिकेच्या एका महिला अधिकार्याकडे पर्यवेक्षणासाठी सुपूर्द केली होती; पण हा गोंधळ सुरू होताच ही महिला अधिकारी ज्या केंद्रावर पोहोचली तेथील उमेदवारांनी तिला घेराव घातला आणि तिला बराच वेळ तेथून बाहेरच पडू दिले नाही. यामुळे कांदिवली परिसरातील अन्य कें द्रांवर बराचवेळ गोंधळ निर्माण झाल्यानंतर तो निस्तरण्यासाठी ही महिला अधिकारी तेथे जाऊ शकली नाही. परिणामी, संतप्त झालेल्या काही उमेदवारांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत मांडली. परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालिकेचे अधिकारी काही ठिकाणी पोहोचले तर काही ठिकाणी जाऊ शकले नाहीत.
'सर्व्हर डाऊन' झाल्याची माहिती पालिका मुख्यालयात मिळाल्यानंतर सामान्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्यांची धावाधाव सुरू झाली. आणि किती केंद्रांवर परीक्षा झालेली नाही, याची माहिती घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. एकूण ३४ केंद्रांवर ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी ठाणे आणि सानपाडा येथील एका केंद्रावर आणि कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालय येथील दोन केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने ही परीक्षा झाली नाही, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांनी रात्री ८ वाजता पत्रकारांना दिली. 'ज्या केंद्रांवर उमेदवारांना परीक्षा देता आली नाही, अशा केंद्रांची माहिती संकलित करून नव्याने ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल आणि परीक्षेसंबंधी तारखा वृत्तपत्रामधून आणि पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे या अधिकार्यांनी सांगितले.