मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात आल्याने महाराष्ट्रातील कित्तेक जिल्ह्यामध्ये आंबेडकरी वस्त्यांमध्ये वातावरण तापले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर कडक कारवाही करावी अशी मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तरुण कोठारी नामक व्यक्तीने फेसबुक या साईटवर https://m.facebook.com/tarun.kothari.161 आपल्या अकाऊन्ट वर जातीय आरक्षणाबाबत कित्तेक आक्षेपार्य पोस्त टाकल्या आहेत. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबत या अकाऊन्टवर आक्षेपार्य पोस्त टाकण्यात आल्या आहेत. फेसबुक वर बाबासाहेबांची विटंबना झाल्याचे निदर्शनास येताच सोलापूर, कराड, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, खालापूर, येथे बंद पाळण्यात आला तर अहमदनगर येथील जामखेड येथील हायवे वर रास्ता रोको करण्यात आला.
पुण्यामधील पिंपरी चिंचवड येथे तणाव निर्माण झाला असून काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यामधील दांडेकर पुलावर तीन बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबई मध्ये ठीक ठिकाणी निषेधाचे फलक लावण्यात आले असून बाबासाहेबांची बदनामी करणाऱ्यावर कारवाही करावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान आंबेडकरी समाजातील बुद्धीजीवी लोकांनी आंबेडकरी जनतेने भावनिक न होता शांत डोक्याने या परिस्थितीचा मुकाबला करावा, पोलिसांकडे या प्रकारची तक्रार करून कारवाही करायला भाग पाडावे, कोणीही कायदा हातात घेवू नये असे आवाहन केले आहे.

पुणे -
"फेसबुक‘वर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्याचे तीव्र आणि संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील विविध ठिकाणी एसटी बसवर दगडफेक झाली. त्यामुळे एसटी प्रशासनाने अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्या.
फेसबुकवरील अवमानाने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. निषेध फेऱ्या काढून ज्यांनी हा मजकूर सोशल मीडियावर टाकला त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे 15 एसटी बस फोडण्यात आल्या. कोल्हापूर शहरात दलित संघटनांनी निषेध फेरी काढून बंदचे आवाहन केले. तरुणांनी मोटारसायकल रॅली काढून शहरातील सर्व व्यवहार बंद करण्यास भाग पाडले. कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. फेरीवाल्यांच्या गाड्या उलथवून टाकून दुकाने, बेकरीवर दगडफेक केली. पोलिस गाडीवर दगडफेक केल्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी गणेश कांबळे (रा. राजेंद्रनगर) यास ताब्यात घेतले.
दरम्यान, नेमके काय झाले हेच माहिती नसल्यामुळे शहरात अफवांचे पीक पसरले. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक औरंगाबाद आदी ठिकाणी दलित संघटनांनी निषेधफेरी काढली. काही ठिकाणी एसटी बसवर दगडफेकही झाली. राज्यात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनीही बंद ठेवून निषेध व्यक्त केला. काही ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांना कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागले.
पुणे - फेसबुकवरील राष्ट्रपुरुषांच्या कथित बदनामीचे पडसाद शहरात रविवारी उमटले. संतप्त आंदोलकांनी पीएमपीला लक्ष्य करत दगडफेक करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात तीस गाड्यांची तोडफोड केली.
फेसबुकवर राष्ट्रपुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याप्रकरणी शहरात तणावपूर्ण शांतता होती. दुपारपासून रस्त्याने धावणाऱ्या पीएमपीवर दगडफेक करण्यास जमावाने सुरवात केली. पीएमपीतील प्रवाशांना खाली उतरवून काचा फोडण्यात येत होत्या. सिंहगड रस्ता, दांडेकर पूल या भागात सर्वाधिक 15 बसची तोडफोड करण्यात आली. तसेच, येथील काही दुकानांवरही दगडफेक करून नुकसान करण्यात आले. नेहरूनगर, टिळक रस्ता, कोथरूड, पिंपरी आदी भागात 30 बस फोडल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली. दगडफेकीत पिंपरी चौकात एका चालकास दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, जमावाकडून दगडफेक करण्यात येत असल्यामुळे अनेक मार्गांवर कमी बस सोडण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. आंबेडकरी जनतेने संयम बाळगत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन आरपीआयचे परशुराम वाडेकर आणि दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण यांनी केले आहे.
दगडफेकप्रकरणी सुमारे चाळीस जणांना ताब्यात घेण्यात आले असून, कारवाई सुरू असल्याचे पोलिस सहआयुक्त संजयकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, ""आक्षेपार्ह छायाचित्रे लोकांकडूनच प्रसारित केली जातात. ती प्रसारित करण्याऐवजी लगेच डिलीट केल्यास समाजकंटकांना कोणतीही संधी मिळणार नाही. फेसबुकवरील आक्षेपार्ह छायाचित्रांबाबत पोलिसांना माहिती दिल्यास 24 तासांत ती काढून टाकण्यात येतात; परंतु व्हॉटस ऍपवरील माहिती डिलीट करण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे.‘‘

इचलकरंजी -
सोशल मीडियावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी व परिसरामध्ये बंद पाळण्यात आला. आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढली. बंदमुळे प्रवाशांचे हाल झाले. गाड्यांचे नुकसान होवू नये, यासाठी एस. टी. ही बंद ठेवण्यात आली.
सोशल मीडियावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध केल्याचे समजल्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकीवरून फेरी काढली. त्यानंतर संपूर्ण व्यवहार नागरिकांनी बंद ठेवले. इचलकरंजीबरोबरच कबनूर, कोरोची व ग्रामीण भागातही व्यवहार बंद ठेवण्यात आले. शिरदवाड रस्त्यावर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. बंदमुळे इचलकरंजी शहरात शुकशुकाट होता. गावभागातील बौद्ध विहारजवळ टायर पेटविण्यात आले. जयभीमनगर झोपडपट्टी येथील कार्यकर्त्यांनी गावभाग पोलिसांना निवेदन दिले. त्याचप्रमाणे भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरामध्ये नगरसेवक रवी रजपूते यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार यांना निवेदन देण्यात आले. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
दरम्यान, कबनूर गावामध्ये दलित संघटना, आंबेडकर प्रेमी नागरिक यांनी चौकात एकत्र येऊन समाज कंटकांचा निषेध केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोची येथे एस. टी. बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काचा फुटल्याने एस. टी. चे नुकसान झाले.
सांगली फाटा येथे महामार्ग रोकला
फेसबुकवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबनेनंतर येथील संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगली फाटा येथे सुमारे एक तास महामार्ग रोकला. उत्स्फूर्त झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. सुजित मिणचेकर व माजी आमदार राजीव आवळे यांनी केले. यांनतर शिरोलीकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवून, या घटनेचा निषेध नोंदवला.
घटनेनंतर संतप्त दलित कार्यकर्त्यांनी सांगली फाटा येथील महामार्ग गाठला. आमदार डॉ. मिणचेकर व माजी आमदार आवळे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. यानंतर माजी आमदार आवळे यांनी समाज मंदिरातील डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी उदय समुद्रे, रणजित केळुसकर, युवा सेनेचे अध्यक्ष मुकूंद नाळे, सुजित समुद्रे, संदिप कांबळे, अमोल कांबळे, संजय पवार, प्रविण जमणे, राजू धनवडे, मोशे कुरणे, किरण माने, उमेश कांबळे, प्रविण माने, अभिजीत शिरोलीकर उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.बी.पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
कुंभोज परिसरात बंद
कुंभोज : विटंबनेव्या निषेधार्थ कुंभोजसह दुर्गेवाडी, हिंगणगाव, नेज, शिवपूरी, बाहुबली आदि गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
बौध्द समाज, आरपीआय, बहुजन मुक्ती पार्टी व बहुजन समाज पार्टीचे संतप्त कार्यकर्ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र जमले. या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. बाळासाहेब डोणे, मेजर मारूती डोणे, राजकुमार भोसले, ऍड. शुक्राचार्य जमणे, सागर जमणे, विजयकुमार भोसले, सुनिल भोसले, अरूण जमणे, सर्जेराव कोले, पांडुरंग भोसले, गणपती डोणे उपस्थित होते.
कुरंदवाड आज बंद
सोशल मिडीयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाल्याचे समजताच कुरूंदवाडसह अनेक गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेचा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. उद्या (ता.9) कुरूंदवाड बंदची हाक दिली आहे. कुरूंदवाडसह दत्तवाड, अकिवाट, शिरदवाड, अब्दुललाट या भागात संतप्त पडसाद उमटले. शिरदवाड येथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. कुरूंदवाड आगाराची कोल्हापूर-कुरूंदवाड गाडी (क्र. एम. एच. 9158) ही एस. टी. दगडफेक करून फोडली. कुरूंदवाडमध्ये दलित मुस्लीम बांधवानी घटनेचा निषेध केला.