मध्य रेल्वे व हार्बरवर मेगाब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वे व हार्बरवर मेगाब्लॉक

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइन रविवारी (१ फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते सीएसटी स्थानकांदरम्यान अप मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. 

मेन लाइनवर माटुंगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर स. ११.३0 ते दु. ३.३0 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यानची डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक स. ११ ते दुपारी ३.२३ वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. परिणामी, विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर डाऊन धीम्या लोकल थांबणार नाहीत. . हार्बर मार्गावर कुर्ला ते सीएसटी स्थानकांदरम्यान अप मार्गावर, तर वडाळा रोड ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.३0 ते दुपारी ३.३0 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सकाळी ११.0८ ते दुपारी ३.२0 वाजेपर्यंत कुर्ला ते सीएसटी स्थानकांदरम्यानची अप मार्गावरील वाहतूक मेन लाइनने चालवण्यात येणार आहे. भायखळा स्थानकापर्यंत जलद अप मार्गावरून, तर भायखळा ते सीएसटी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. या लोकल गाड्यांना सायन, माटुंगा, दादर आणि परेल या स्थानकांवरवर थांबा देण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages