राणीबाग़शेजारील मोकळ्या जागेत उद्यानच रहावे रहिवाशांचे मतदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राणीबाग़शेजारील मोकळ्या जागेत उद्यानच रहावे रहिवाशांचे मतदान

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या राणीबाग़ येथील खेळाचे मैदान असलेल्या भूखंडावर पालिका उभारत असलेल्या पार्किंगला विरोध करत स्थानिक रहिवाश्यानी या जागेवर खेळाचे मैदानच असेल पाहिजे यासाठी मतदान केले आहे. मनसेच्या स्थानिक नगरसेविका सविता नाइक यानी घेतलेल्या मतदानातुन स्थानिक रहिवाश्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नगरसेविका सविता नाइक यानी तीन दिवस राणीबाग़ जवळील मैदानावर स्थानिक जनतेचे मतदान घेतले या वेळी ७००० मतपत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६८८३ लोकानी मैदान हवे असल्याचे म्हटले आहे. तर फ़क्त २ लोकानी मैदानाला विरोध केला आहे. पालिका मुख्यालयातील मनसेच्या कार्यालयात या मतदानाची मोजणी पत्रकारांसमोर करण्यात आली. स्थानिक रहिवाश्यानी केलेल मतदान पालिका आयुक्तांना देण्यासाठी मनसेचे गतनेते संदीप देशपांडे आणि इतर नगरसेवक गेले असता आयुक्तानी भेट नाकारल्याने पुढील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. वेळ पडल्यास कोर्टात जाऊ असा इशारा देशपांडे यानी दिला आहे. मुंबई मध्ये मैदाने कमी प्रमाणात आहेत, भायखळा येथे हे एकमेव मैदान आहे ते वाचले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे देशपांडे यानी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages