मुंबई मधील ६० टक्के जनता झोपड़पट्टीत राहते. डोंगरावर अनेक झोपड्या असून या झोपडयाना कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होतो. यामुले पाणी टंचाईला या लोकाना समोर जावे लागते. झोपड़पट्टीमधे रस्ते, मलनिस्सारण, शौचालय यांची चांगली सुविधा मिळत नाही. घाणीचेही सामराज्य असते. अशी परिस्थिती असताना पालिकेच्या स्थायी समिती मधे उंचावरील झोपड्या, आदिवासी पाडे, प्रकल्प बधितांच्या इमारती याना पाणी पुरवठा करणार्या शोषण टाक्या, उन्दंचन केंद्र चालवनेणे व परिरक्षण करणे यासाठी दर हजार लिटर्स मागे ३५ पैसे आणि पुढील वर्षी ४५ पैसे इतकी छुपी दरवाढ मंजूर करण्यात आली आहे. पालिकेतील सत्ताधारी असलेल्या सेना भाजपाने हा प्रस्ताव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या दरवाढीच्या विरोधाकड़े दुर्लक्ष केले आहे. सदर दरवाढीचा प्रस्ताव राखून ठेवण्याची चर्चा करण्यात आली होती तरीही विरोधकाना या प्रस्तावावर चर्चा करण्याची संधि देण्यात आलेली नाही. यामुले या प्रस्तावाची अमलबजावणी करू नए अशी मागणी करणारे पत्र आयुक्ताना देण्यात येणार असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आम्बेरकर यानी पत्रकाराना सांगितले आहे.
Home
Unlabelled
झोपड़पट्टीतील पाणीपट्टी दरवाढीचा फेरविचार करा - देवेंद्र आम्बेरकर
झोपड़पट्टीतील पाणीपट्टी दरवाढीचा फेरविचार करा - देवेंद्र आम्बेरकर
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.
