स्वयंचलित दरवाजा लोकलची ना उत्सुकता ना आकर्षण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वयंचलित दरवाजा लोकलची ना उत्सुकता ना आकर्षण

Share This
मुंबई : मोठा गाजावाजा करून पश्‍चिम रेल्वेने रविवारपासून एका डब्यात सुरू केलेल्या स्वयंचलित दरवाजाबद्दल प्रवाशांना ना उत्सुकता ना आकर्षण, असे वातावरण पहिल्या दिवशी निदर्शनास आले. महिलांच्या प्रथम श्रेणीच्या एका डब्याला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले. सोमवारपासून मात्र या सुविधेबद्दल महिला प्रवाशांकडून शाब्दिक हारतुरे देण्यात येतील. दरवाजे स्वयंचलित असल्याने त्याचे नियंत्रण गार्डच्या केबिनमध्ये असणार आहे. स्थानक आल्यानंतर गार्डने कळ दाबली की, दरवाजा उघडेल आणि दीड सेकंदात आपोआप बंद होईल.


या सुविधेचा शुभारंभ रविवारी झाला; पण तो पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत. रेल्वेच्या अधिकार्‍यांनाच एवढी 'उत्सुकता' असल्याने तशीच ती महिला प्रवाशांमध्येही दिसून आली. रविवार असल्याने महिलांच्या डब्यात तुरळक प्रवासी होत्या. ज्यांनी यातून प्रवास केला, त्यांनीही फारसे औत्सुक्य दाखवले नाही व आकर्षणदेखील नव्हते. 'रेक युनिट क्र. २२७३/२२७४' हा दुपारी १२.१२ वाजता चर्चगेटच्या फलाट क्र. २ वरून बोरिवलीस (बोरिवली ९0५२१) सोडण्यात आला आणि ही धीमी लोकल दुपारी १.१७ वाजता बोरिवलीच्या फलाट क्र. ७ वर पोहचली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages