मुंबई : नोकरीच्या शोधात असलेले कामगार आणि योग्य कामगारांच्या शोधात असलेल्या नियोक्ता म्हणजेच कंपन्यांसाठी सामायिक व्यासपीठ निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम आयकोड मॅनेजमेंट सिस्टीम प्रा.लि. कंपनीने केले आहे. या कंपनीने कामगार उमेदवार आणि नियोक्ता यांना एकाच ठिकाणी आणणारे ई-एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज अँपची निर्मिती केली आहे.
या अँपअंतर्गत रोजगाराच्या शोधातील उमेदवारांसाठी अवघ्या ३00 रुपये शुल्कात आजीवन आयकोड प्रोफाईल्स सेवा पुरवली जाते. यासाठी वय, शिक्षण, रोजगाराचे क्षेत्र असे कोणतेही बंधन नसते. कंपन्यांसाठी सर्व आयकोड प्रोफाईल्स नेहमी मोफत उपलब्ध करून दिले जातात. यासाठी कंपन्या आणि उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसल्याची माहिती अँपचे अध्यक्ष उदय शेट्टी यांनी दिली. आयकोडमध्ये ई-एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज अँपमध्ये नोंदणी केल्यानंतर सर्व उमेदवारांची सविस्तर माहिती उपलब्ध होते. नियोक्ता कंपनी यातील योग्य उमेदवाराची निवड करू शकते. उमेदवारांसाठी यादीतील नोंदणी आजीवन वैध असते. भविष्यात प्रोफाईलमध्ये बदल करायचा असल्याची सुविधाही उपलब्ध आहे. आयकोडसीटी.कॉम-ई-एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजचे उद्देश तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देऊन बेरोजगारी घटवणे आहे. नियोक्ता कंपन्यांप्रमाणे भारतीय पोस्ट खात्यातील ४२ हजार पोस्ट कार्यालयानेही या संकल्पनेस पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने आयकोडला कॉपीराईट अधिकार देखील दिला असल्याची माहिती उदय शेट्टी यांनी दिली.