पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना छायाचित्रण कलेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम कौतुकास्पद - उपमहापौर अलका केरकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना छायाचित्रण कलेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम कौतुकास्पद - उपमहापौर अलका केरकर

Share This
मुंबई - "मुंबई या विषयावरील अत्यंत गुणवत्तापूर्ण व बोलक्या छायाचित्रांचे प्रदर्शन व छायाचित्र स्पर्धा सातत्याने २१ वर्षे यशस्वीपणे आयोजित करण्याचा महापालिकेच्या शिक्षण विभागाचा प्रयत्न स्तुत्य व अभिनंदनीय असून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देखील छायाचित्रण कलेचे प्रशिक्षण एका विशेष कार्यशाळेद्वारे दिले जाते हे निश्चितच कौतुकास्पद आहे",असे प्रतिपादन मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर यांनी केलेमुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना उपमहापौर (दि.३१ मार्च२०१५बोलत होत्या.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला छायाचित्र स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचा समावेश असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमहापौर अलका केरकर यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलेउपमहापौरांसह उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रदर्शनातील छायाचित्रांचे अवलोकन करीत `मुंबईया विषयावर असलेली सर्वच छायाचित्रे अतिशय बोलकी व लक्षवेधी असल्याचे नमूद केलेविशेषकरुनमहापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी छायाचित्रणविषयक कार्यशाळेला उपस्थिती नोंदवून त्यानंतर काढलेल्या छायाचित्रांचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.

महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या`मुंबईया विषयावरील प्रदर्शनामध्ये मुंबईशी संबंधित विविध विषयांवरील मनोवेधक छायाचित्रांचा समावेश आहेयामध्ये प्रामुख्याने मुंबईकरांचे दैनंदिन जीवनमुंबईतील सण-उत्सवबाजार,आरोग्यसेवावाहतूकसमुद्रकिनाराउद्यानेमुंबईतील इमारती,वास्तुशिल्पेप्रार्थनास्थळेप्राणी अशी मुंबईची विविधांगी वैशिष्ट्ये कलात्मकरित्या मांडणाऱया छायाचित्रांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेली छायाचित्र स्पर्धा शालेय विद्यार्थी गटमहापालिका कर्मचारी गट व खुला गट अशा तीन गटांमध्ये विभागण्यात आली होतीया तीनही गटांतील पारितोषिक प्राप्त छायाचित्रांच्या छायाचित्रकारांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलेशालेय विद्यार्थी गटामध्ये नौपाडा उर्दू मनपा शाळेतील विद्यार्थी सय्यद मुब्बशीर रहबर याला प्रथम पारितोषिक तर तुळशेतपाडा मराठी मनपा शाळेतील विद्यार्थी आदित्य सहदेव वलेकर व नेहरुनगर मराठी १ मनपा शाळेतील विद्यार्थी हिमांशू कांजी सौदर्वा यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी गटामध्ये संगीता चव्हाण यांना प्रथम पारितोषिकअश्विनी शिर्के यांना द्वितीय पारितोषिक तर सुधीर देवकाते यांना तृतीय पारितोषिकाने गौरविण्यात आलेतसेच खुल्या गटामध्ये संकेत राठोड यांना प्रथम पारितोषिक तर संगीता एसराव व डॉसुवर्णा गावडे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिकाने गौरविण्यात आलेयाचबरोबर तीनही गटामध्ये एकूण ११ उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

`मुंबईया विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या १० एप्रिल २०१५ पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळूनसकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत सर्वांसाठी खुले असणार आहे.हे प्रदर्शन दादर पूर्व परिसरातील हिंदू कॉलनीमधील लखमशी नप्पू मार्गावरील महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या मुख्यालयातील दुसऱया मजल्यावर असणाऱया कला दालनामध्ये आयोजित करण्यात आले आहेतरी अधिकाधिक रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages