मुंबई : मुंबई महापालिकेच्या मासळी बाजार व मंडयांमध्ये महिला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र शौचालये, विश्रांतीगृह आणि स्वच्छता त्वरित न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात येईल आणि कामचुकार अधिकारी व कर्मचार्यांना निलंबित करण्याची शिफारसही त्यांना करेन, अशी तंबी पालिकेच्या बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष अजित भंडारी यांनी दिली. पालिकेच्या अखत्यारीतील विविध मासळी बाजार आणि मंडयांची दुरुस्ती कामे आणि पुनर्विकास करताना त्यात काळानुरूप सर्वसमावेशक सुधारणा कराव्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुंबई शहर व उपनगरातील मंडया व मासळी बाजार निर्माण करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
Post Top Ad
23 May 2015
Home
Unlabelled
पालिकेच्या कामचुकार अधिकारी, कर्मचार्यांना निलंबित करण्याची शिफारस
पालिकेच्या कामचुकार अधिकारी, कर्मचार्यांना निलंबित करण्याची शिफारस
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

