लोकलमधील ‘चॅरिटी’ला लगाम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2015

लोकलमधील ‘चॅरिटी’ला लगाम

मुंबई – मागील काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये कॅन्सरपीडित आणि इतर कार्यासाठी निधी गोळा करण्याचे प्रमाण काही जणांकडून वाढले आहे. सुशिक्षित २-३ मुले-मुली लोकलच्या डब्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून माहिती देत प्रवाशांकडून निधी जमा करत असतात.

अनेक प्रवासी सकारात्मक विचार करून सढळ हाताने मदतही करतात, मात्र जमा झालेला हा निधी गरजूंपर्यंत पोहोचतो की नाही? निधी जमा करणारी संस्था नोंदणीकृत आहे की नाही? याची अनेक वेळा शहानिशा केली जात नाही. मागील काही दिवसांत हे प्रमाण अधिकच वाढल्याने अशाप्रकारे अनधिकृत निधी जमा करणा-यांविरोधात रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरू आहे.
या कारवाईत अंधेरी स्थानकात अशाप्रकारे अनधिकृत निधी जमवणा-यादोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप मनोहर देसाई आणि पंकज चंद्रशेखर दुबे अशी या दोघांची नावे आहेत. याबाबत प्रवाशांकडून तक्रारी येत असल्याने ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या रेल्वे पंधरवडयात रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिलांच्या आणि अपंगांच्या डब्यात प्रवास करणे, अनधिकृत फेरीवाले, गर्दुल्ले आणि दलाल अशा ९०० जणांवर कारवाई केली आहे. यातून १ लाख ३६ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS