काळबादेवी येथील आगीचे गुढ आज उलगडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2015

काळबादेवी येथील आगीचे गुढ आज उलगडणार

मुंबई / प्रतिनिधी - अग्निशमन दलाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी घेणाऱ्या काळबादेवी येथील आगीचे गुढ आज (सोमवारी) उलगडणार आहे. महानगर पालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय उप समितीचा अहवाल सोमवारी प्रशासनाला सादर होण्याची शक्‍यता आहे. या अहवालात आग लागण्याचे तसेच आग पसरण्याची कारणे उघड होण्याची शक्‍यता आहे. 

गोकूळ निवास या इमारतीला लागलेल्या आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारचे अग्निशमन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली ही त्रिसदस्यीय उप समिती नियुक्त करण्यात आली होती. यात अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अभियात्रिकी आणि नियोजन विभागाचे मुख्य अभियंता यांचा समावेश आहे. या उप समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत सात दिवस वाढविण्यात आली. मात्र,त्यानंतरही हा अहवाल तयार न झाल्याने अखेरीस सोमवारी हा अहवाल सादर होण्याची शक्‍यता आहे. या समितीकडे आगीची कारणांची तसेच आग वेगाने परण्याचा कारणाचा शोध या समितीने घेतला आहे

Post Bottom Ad

JPN NEWS