जेट एअरवेजकडून खा. आठवलेंचा अवमान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2015

जेट एअरवेजकडून खा. आठवलेंचा अवमान

मुंबई : विमानतळावर प्रवाशांच्या गैरसोयींच्या घटना वारंवार घडत असतानाच आता जेट एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांच्या मुजोरीपणाचा फटका मंगळवारी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांना बसला. त्यांच्या अवमानाचा घाव जिव्हारी लागलेल्या रिपाइंच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी अंधेरी, सहार येथील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

खा. आठवले यांचा मंगळवार, २६ मे रोजी औरंगाबाद येथे नियोजित दौरा होता. ते पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईहून औरंगाबादला जाण्यासाठी एअरपोर्टला पोहोचले व त्यांनी बोर्डिंग केले असतानाही जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांनी त्यांना विमानामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला. मुंबईहून औरंगाबादला जाणार्‍या विमानाची वेळ पहाटे ५ वाजून १५ मिनिटांची होती. आठवले हे चेक इन करण्यासाठी ४ वाजून ४५ मिनिटांनी विमानतळावर पोहोचले होते. असे असतानाही येथील कर्मचार्‍यांनी त्यांना बोर्डिंग गेटमधून विमानापर्यंत जाऊ दिले नाही. विशेष म्हणजे गेट बंद करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची घोषणा जेट प्रशासनाकडून करण्यात आली नाही. या घटनेमुळे रिपाइंचे कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी जेट एअरवेज प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी जेट एअरवेजच्या अंधेरी, सहार येथील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत प्रशासनाने माफी मागावी, अशी मागणी केली. जेट एअरवेजच्या संचालक मंडळाचे उपाध्यक्ष चाळके यांनी रिपाइंच्या शिष्टमंडळाला भेट देऊन आठवलेंच्या झालेल्या अवमानाप्रकरणी जाहीर माफी मागितली व कर्मचार्‍यांची चुकी झाली, असे त्यांनी सांगितले. यापुढे असे न घडण्याबाबत पूर्ण दक्षता घेऊ, असे आश्‍वासन देत आपण स्वत: या प्रकरणी खा. आठवले यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त करू, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS