विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर फोफावतोय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2015

विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर फोफावतोय

मुंबई : शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी उच्चभ्रू लाईफस्टाईलचे गॅझेट, अधिकाधिक इंटरनेट युर्जस आणि सोशल मीडियावर कार्यरत राहून कुटुंबाशी, मित्रांशी संपर्क ठेवत आहेत. या माध्यमातून वर्तमान कामकाजाची माहितीही घेत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. सध्याचे युवा अजूनही फेस टू फेस किंवा इन पर्सन अर्थात वैयक्तिक संवादाला प्राधान्य देत असून त्याचे प्रमाण ३६ टक्के, तर व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून संपर्कात राहणारे ४६ टक्के प्रमाण आहे. तसेच व्हॉटअपसारख्या इन्स्टंट मॅसेजिंगचे प्रमाण ५८ टक्के, त्यातच २0 टक्के एसएमएसचे प्रमाण आहे. 

जागतिक अर्थव्यवस्थेत डिजिटल युग सुरू असताना भारतीय शालेय विद्यार्थ्यांकडून अत्यंत वेगाने डिजिटल लाईफस्टाईल आत्मसात करण्यात येत आहे. आयटी सेवा सल्ला पुरवणार्‍या व बिझनेस सोल्युशन संस्था असणार्‍या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसच्या माध्यमातून देशातील १४ शहरांमध्ये आयोजित टीसीएसजेएनवाय स्टडी २0१४ : १५ या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. डेस्कॉप / घरच्या संगणक आणि लॅपटॉप हे इंटरनेट वापराचे सर्वाधिक लोकप्रिय (५५ टक्के) त्यातच ३0 टक्के स्मार्टफोनचे प्रमाण आहे. ७२ टक्के स्वत:च्या स्मार्टफोनला पसंती देत असून घरचा संगणक, लॅपटॉपमूधन इंटरनेट वापरणार्‍यांचे प्रमाण ५0 टक्के इतके आहे.

सोशल मीडियावर सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत असला, तरी शिक्षणासाठी मात्र त्याचा वापर केला जात नाही. १0 पैकी ९ जणांनी फेसबुक अकाऊंट्स असून त्यापैकी ५२ टक्के फेसबुकवर किमान एका कम्युनिटीचा भाग आहेत. ६५ टक्के मुलांचे गुगल प्लस अकाऊंट्स आहेत. १0 पैकी ६ जण व्हॉट्सअँपचा वापर करतात. तसेच १0 पैकी ४ जण ट्विटरवर स्पोर्ट्स पर्सनालिटी (६६ टक्के), सेलिब्रिटी (५५ टक्के) आणि फिल्म स्टार्स (५४ टक्के) यांना फॉलो करीत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. अभ्यासासाठी सोशल मीडियाचा वापर उपयुक्त नाही, मात्र मित्रांशी संपर्कात राहणे, कुटुंबीयांची माहिती घेणे आणि चालू घडामोंडीची माहिती मिळवणे यासाठी सोशल मीडिया उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. 

१0 पैकी ३ जण ५ मिनिटांत नोटिफिकेशनला प्रतिसाद देतात. दिवसातून हे प्रमाण १0 पैकी ४ असेही असते. सरासरी ७६ टक्के जण ६0 मिनिटे वेळ सोशल मीडियावर दरदिवशी व्यतित करतात. विकिपिडीया सारख्या ऑनलाइन स्रोतांचा वापर ६३ टक्के होतो. त्यातून ५१ टक्के पीडीएफ आणि अभ्यासासाठी ४४ टक्के ऑनलाइन व्हिडीओचा वापर करतात. टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या ऑनलाइन ग्राहकांचे प्रमाण (७६ टक्के), ऑनलाइन सोर्स (५१ टक्के) आणि मित्र / कुटुंबातील व्यक्तींकडून पाठवलेली लिंक (३६ टक्के) आहे. आयटी आणि इंजिनीयरिंग विद्यार्थी करिअर निवडताना इंटरनेटचा वापर करतात. विशेषत: प्रत्येकी ५९ टक्के मुले, ४२ टक्के मुली असे प्रमाण आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS