मुंबई / प्रतिनिधी - भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागास शासनाकडून कोणताही शासन निर्णय अथवा आदेश प्राप्त झालेले नाहीत. तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे शिक्षण विभागानेही खातेस्तरावर भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कोणतीही शिष्यवृत्ती योजना सुरु केलेली नाही. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून प्रसार होत असलेल्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.
Post Top Ad
30 May 2015
Home
Unlabelled
अब्दुल कलाम यांच्या नावाने कोणतीही शिष्यवृत्ती योजना नाही
अब्दुल कलाम यांच्या नावाने कोणतीही शिष्यवृत्ती योजना नाही
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

