परदेश दौ-यात मोदींनी तीन लाखांच्या वस्तू स्वीकारल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 June 2015

परदेश दौ-यात मोदींनी तीन लाखांच्या वस्तू स्वीकारल्या


नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून परदेश दौ-यात सुमारे ३.११ लाख रुपयांच्या भेटवस्तू स्वीकारल्याचे माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. गेल्या १० महिन्यांत या भेटवस्तू स्वीकारलेल्या आहेत.

१९ फेब्रुवारी रोजी मोदींनी सोने व हि-याची बांधणी असलेली सुमारे ७५ हजार रुपयांची कफलिंक स्वीकारली. दोन वेळा चहाचे सेट, पुस्तके व इतर अनेक भेटवस्तू त्यांनी स्वीकारल्या. मोदींना भगवान गौतम बुद्धांची एक प्रतिमाही भेट स्वरूपात मिळाली आहे.
विविध मंदिरांच्या प्रतिकृती, पेंटिंग्ज, कारपेट, छायाचित्रे व दागिने अशा ब -याच भेटवस्तू मोदींनी या दहा महिन्यांच्या काळात मिळाल्या.

सरकारी कर्मचा-यांच्या भेटवस्तू सरकारी तिजोरीत : 
परदेशाच्या दौ -यात सरकारी अधिका -यांना मिळालेल्या पाच हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या भेटवस्तू सरकारी तिजोरीत जमा करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिली आहे. माहितीच्या कायद्यामुळे ही माहिती मिळू शकली.

डॉ. सिंग यांना मिळाल्या ८३ वस्तू
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना २०१० ते जून २०१३ या काळात सुमारे ८३ लाख ७२ हजार रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. यात ४८ लाखांचे दागिने, टेबल क्लॉक, पेन, भगवान पशुपतीनाथांची प्रतिमा इत्यादीचा समावेश आहे.

२०१० ते जून २०१३
सोनिया गांधी : परदेश दौ-यात ३.८४ लाख रुपयांच्या भेटवस्तू. यात ब्रासलेट, पर्स, रग, चांदीची फोटोफ्रेम इत्यादीचा समावेश.
सुषमा स्वराज : ४.८३ लाख रुपयांच्या भेटवस्तू स्वीकारल्या. यात साड्या, दागिने, पेंटिंग्ज, चायना डिशेस.

Post Bottom Ad

JPN NEWS