मुंबई / प्रतिनिधी - उपकर प्राप्त इमारतीं मधून म्हाडाला किती भांडवली मुल्य व किती सदनिका मिळाल्या अशी माहिती २०१२ मध्ये मागितली होती. माहिती अधिकारात माहिती असतानाही चुकीची माहिती सदर करण्यात आली. याबाबत माहिती आयोग व माहिती आयुक्त यांच्या पर्यंत तक्रार व अपील दाखल केल्यावर माहिती देण्याचे आदेश देण्यात आले. परंतू अद्यापही म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींची माहिती दिली जात नसल्याने आरटीआय कार्यकर्ते दिलीप गायकवाड सोमवार १५ जून पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदुत उपोषणाला बसणार आहेत. म्हाडाच्या उपकर प्रपात इमारतीचे भांडवली मुल्य आणि सदनिका यामध्ये घोटाळा असल्याने माहिती लपविली जात असल्याचा आरोप दिलीप गायकवाड यांनी केला आहे. जो पर्यंत माहिती आयोगाने दिलेल्या आदेशा प्रमाणे माहिती दिली जात नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहनार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे
Post Top Ad
14 June 2015
Home
Unlabelled
माहिती नाकारणाऱ्या म्हाडा विरोधात उपोषण
माहिती नाकारणाऱ्या म्हाडा विरोधात उपोषण
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

