महापौरांच्या हस्ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2015

महापौरांच्या हस्ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

मुंबई (प्रतिनिधी): महानगरपालिकेचे  ना.म.जोशी मार्ग शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप महानगरपालिका खाजगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना दर्जेदार सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करित असून आज याठिकाणी विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱया शालेय साहित्यांचे वितरण त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.

महानगरपालिकेच्या डिलाईल रोडवरील ना.म.जोशी मार्ग प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण महापौरांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  महापौर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, व्हर्च्युअल सरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महानगरपालिका लवकरच आठवीच्या  विद्यार्थ्यांना टॅब देणार असून खाजगी शाळांच्या तुलनेत  महानगरपालिका दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच जास्तीत जास्त शाळांमध्ये संगणक लॅब सुरु करीत असल्याचेही महापौरांनी सांगितले. एकंदरित सेवा-सुविधा बघता पालिका शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले. महापौरांच्या हस्ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Post Bottom Ad

JPN NEWS