सिलेंडर स्फोटात 8 लोकांचा मृत्यु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2015

सिलेंडर स्फोटात 8 लोकांचा मृत्यु

मुंबई / प्रतिनिधी
कुर्ला सिटी कोहिनूर मॉल समोरील सिटी किनारा या चायनीज कॉर्नर या हॉटेलला शुक्रवारी दुपारी 1.51 ला सिलेंडर स्फोट झाला. या स्फोटामधे 8 लोकांचा मृत्यु झाल्याची माहिती पालिकेच्या आपत कालीन विभागाने दिली आहे.

सिटी किनारा या चायनीज कॉर्नर हॉटेलचे बांधकाम तळमजला अधिक एक माला असे होते. वरच्या मजल्यावरुन तळ मजल्यावर ग्यासची पाईपलाइन नेण्यात आली होती. तळ मजल्यावर चायनीज फ़ूड बनवले जात असतानाच पाईपलाइनमधे आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडर स्फोटातील जखमिना राजावाड़ी रुग्णालयात नेण्यापुर्वीच 8 लोकांचा मृत्यु झाला आहे. मृत व्यक्तींमधे 7 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम पोलिस विभागामार्फ़त सुरु आहे. सदर आगीमधे होटेल मधील इलेक्ट्रिक वायर्स, लाकडी फर्नीचर ज़लून ख़ाक झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS