फुकटया प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने कमावले ५० कोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2015

फुकटया प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने कमावले ५० कोटी


मुंबई -  फुकटया प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे मागील सहा महिन्यांत ५० कोटी रुपयांची रक्कम पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील तिकीट तपासनीसांनी सहा महिन्यांत केलेल्या कारवाईत तब्बल १२ लाख जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईत सुमारे ५० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. यामध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांमध्ये ७१ हजार ४३६ जणांवर कारवाई करण्यात आली. यामधून २ कोटी रुपयांची दंडाची रक्कम रेल्वेच्या तिजोरीत जमा झाली. विशेष म्हणजे मागील वर्षी विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईच्या तुलनेत यावर्षी करण्यात आलेल्या कारवाईत रेल्वेला १० टक्क्यांचे अधिक उत्पन्न मिळाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS