विक्रोळीत गैस सिलंडर स्पोटात १० जखमी - चौघांची प्रकृती गंभीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2015

विक्रोळीत गैस सिलंडर स्पोटात १० जखमी - चौघांची प्रकृती गंभीर

मुंबई (प्रतिनिधी): कुर्ला येथे गैस गळती होवून घडलेल्या भीषण दुर्घटनेची पुर्नावृती आज विक्रोळी पार्कसाईट येथे घडली. आज दुपारी ठेथिल आंबेडकर सोसायटीतील एका घरात सिलेंडर मधेउन गैस्ची गळती झाले. त्यांना उपचारासाठी राजावाडी, सायन तसेच कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी ४ जनाची प्रकृती गंभीर आहे.

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार विक्रोळी पार्क साईट येथील वर्षानगर मध्ये वन प्लस वन अशी बांधकाम असलेली आंबेडकर सोसायटी आहे. या सोसायटीतील  खोली क्र. ५ मध्ये दुपारी ११ वाजून ५२ मिनीटानी अचानक गैस सिलेंडर मधून गैसची गळती होऊन सिलेंडरचा स्पोट इतका भीषण होता की खालच्या घरच्या भिंत कोसळल्या तसेच आजूबाजूच्या परिसरास एकाच खळबळ उडाली स्थानिक रहिवाशांनी याबाबत अग्निशमन दलाची संपर्क साधला अग्निशमन दलाच्या जवानांनी ३ फायर इंजिन, २ वाटर टंकर सह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित मदतकार्य हाती घेवून या घानेत जखमी जाह्लेल्या १० जणांना उपचारासाठी राजावाडी, सायनतसेच कस्तुरबा रुग्णालयात पाठवले.

जखमी झालेली माणसांची नावे संतोष शिंदे (३१),अनिकेत चव्हाण (१७), सपना चव्हाण (१३), विमल  चव्हाण (१७), देवगण सिंह, राहुल दानवले (२२), सौरभ  चव्हाण (१७), सुमन दानवले (४५), विजय विष्णू सावंत (४१),मीराबाई माने (६५), त्य्पैकी सपना, विमल व देवगण हे ८० टक्के तर संतोष हा ६० टक्के भाजला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

काल  कुर्ला कमानी येथील सिटी किनारा या चायनीज फास्ट फूडच्या हॉटेल मध्ये काळ गैस गळती होवून लागलेल्या आगीत ८ जणांना दुर्देवी अंत झाला. या घटनेचा २४ तास उलटण्याच्या आत पुन्हा असाच प्रसंग विक्रोळी पार्क साईट येथे घडल्याने मुंबईमध्ये इक्च खळबळ उडाली असून या दुर्देवी प्रकाराबाबत सगळी कडे  हळहळ व्यक्त होत आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS