डॉ. आंबेडकर स्मारकाच्या सरकारी संकल्पनेला आंबेडकरी पक्ष संघटनांचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 October 2015

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या सरकारी संकल्पनेला आंबेडकरी पक्ष संघटनांचा विरोध

स्मारक सरकारच्या मर्जिचे नव्हे तर आंबेडकरांच्या धेय उद्धिष्ठानुसार व्हावे
"स्ट्याच्यू ऑफ इक्व्यालिटी"ची आनंदराज, आठवले यांची मागणी
मुंबई / अजेयकुमार जाधव / 8 Oct 2015
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दहा वर्षाच्या लढया नंतर दादर येथील इंदू मिल मध्ये साकारले जात आहे. बाबासाहेबांच्या स्मारकाचे जे संकल्प चित्र बनवण्यात आले आहे त्याला आंबेडकरी जनता, पक्ष संघटना यांनी जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली आहे. बाबासाहेबांच्या इंदू मिल मधील स्मारकाचे रविवारी 11 ओक्टोबरला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असतानाच आंबेडकरी पक्ष संघटनांनी आपला विरोध तीव्र करण्यास सुरुवात केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सरकारच्या मर्जिचे नव्हे तर आंबेडकरांच्या धेय उद्धिष्ठानुसार व्हावे. सरकारने चैत्यभूमीचा विकास करण्यासाठी इंदू मिलची जागा संपादित केली आहे. या जागेवर आता बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार आहे. चैत्यभूमी हि भारतीय बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली आहे. याच प्रमाणे इंदू मिल मधील स्मारकही भारतीय बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली असावे. सरकारने बनवलेल्या सुकाणू समिती मध्ये भारतीय बौद्ध महासभेला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. सरकारने बौद्ध महासभेला त्वरित प्रतिनिधित्व द्यावे अश्या मागण्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक मुकुंदराव आंबेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केल्या आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन करताना काही उद्धीस्ट समोर ठेवली आहेत. या उद्धीस्टाप्रमाणे इंदू मिलच्या जागेवर भव्य रुग्णालय, सर्व धर्मांचा तुलनात्मक अध्ययन करता येईल असे ग्रंथालय, भव्य स्तूप, बौद्ध धम्माची खरी माहिती देणारे साहित्य प्रकाशन करण्यासाठी प्रिंटींग प्रेस, ६ डिसेंबरला लाखोंच्या संखेने येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी राहण्याची व जेवणाची सोय करता येईल  असेसंकल्प चित्र बनवावे. बाबासाहेबांचे स्मारक भव्य पुतळा व बाग बगीचा बनवून केवळ वर्षातील दोन तीन दिवस लोक येतील असे न राहता वर्षाचे ३६५ दिवस लोकांची येजा सुरु राहावी असे स्मारक बनवावे अशी मागणी राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे.

कोंकण रिपब्लिकन या सामाजिक संघटनेद्वारे ११ ऑक्टोबर रोजी स्मारकाच्या होणाऱ्या भूमिपूजनाला विरोध करण्यात आला आहे. बाबासाहेबांचे स्मारक राजघाटाच्या दर्तीवर असावे, स्मारकाचे प्रवेश द्वार बौद्ध स्थापत्याचे असावे, संरक्षण भिंती बौद्ध स्थापत्याचा उत्तम नमुना असाव्यात, आंबेडकरी कलावंतांसाठी खुले नाट्यमंच असावे, भिक्खू संघाला निवासस्थान असावे, बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचे म्युझियम असावे इत्यादी मागण्या पत्रकार परिषदेत केल्या आहेत. तर रिपब्लिकन पक्ष ( खरात ) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी स्मारक शशी प्रभू यांच्या संकल्प चित्रानुसार बनवण्यास विरोध केला आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते उद्घाटनाच्या ठिकाणी तीव्र निदर्शने करतील असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

"स्ट्याच्यू ऑफ इक्व्यालिटी"ची आनंदराज, आठवले यांची मागणी 
रिपब्लिकन सेनेचे आनाद्राज आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाच्या संकल्प चित्राला विरोध केला आहे. शशी प्रभू यांचे संकल्प चित्र नकोच अशी भूमिका घेतली आहे. बाबासाहेबांच्या स्मारकामध्ये अमेरिकेच्या स्ट्याच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर "स्ट्याच्यू ऑफ इक्व्यालिटी"चा संदेश देणारा बाबासाहेबांचा ३५० फुटांचा पुतळा उभारावा आशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनीही बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात स्मारकाच्या संकल्प चित्राबाबत नाराजी व्यक्त करत "स्ट्याच्यू ऑफ इक्व्यालिटी"चा संदेश देणारा बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा करावा अशी मागणी केली आहे. सरकार अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहे त्याच धर्तीवर अरबी समुद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "स्ट्याच्यू ऑफ इक्व्यालिटी"चा संदेश देणारा अमेरिकेच्या स्ट्याच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा उभारावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS