पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) -  जुहू पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशीरा घडली. चेतन सोनावणे (२७) असे त्यांचे नाव आहे. २००९च्या पोलिस बॅचचे आहेत. कल्याण येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली.

सोनावणे हे गेल्याच महिन्यात जुहू पोलीस ठाण्यात रूजू झाले होते. बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घरात एकटे असताना सोनावणे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात त्यांची गरोदर पत्नी असून ती माहेरी गेली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages