मुंबई दि. १६ -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि. १७ सप्टेंबर रोजी मुंबई भाजपातर्फे मुंबईत ३६ ठिकाणी अवयवदान संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे.
मुंबईत ठिकठिकणी भाजपातर्फे हे अभियान राबवण्यात येणार असून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक ठिकाणी किमान ५० अर्ज भरून संकलित होणारी माहिती महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये माटुंगा, धारावी, गोरेगांव, बोरिवली, मुलूंड, भांडूप सह दादर आणि दक्षिण मुंबईतही हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष सुमंत घैसास यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिले आहे.
महाराष्ट्र सरकारने अवयवदान संकल्प अभियान हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून भाजपा तर्फे हे अभियान राबवण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या अभियानामागे असल्याचे ही घैसास यांनी सांगितले.