७ व ८ जुलै रोजी मुंबई शहर विभागात २४ तासांकरीता पाणीपुरवठा खंडित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2017

७ व ८ जुलै रोजी मुंबई शहर विभागात २४ तासांकरीता पाणीपुरवठा खंडित


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ३००० मि.मी. व्यासाच्या भूमिगत बोगद्याजवळ १२०० मि.मी व्यासाच्या झडपेची दुरुस्ती, मलबार टेकडी जलाशयाच्याटप्पा क्रमांक २ ची संरचनात्मक तपासणी, तानसा (पूर्व व पश्चिम) जलवाहिन्यांवर नवीन झडपा बसविणे आणि धोबीतलाव आऊटलेट जलवाहिनीवर झडपबसविण्याचे काम शुक्रवार, दिनांक ०७ जुलै, २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून शनिवार, दिनांक ०८ जुलै, २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येत आहे. सदर काम करण्याकरीता मरोळ- मरोशी पासून माहिम – रुपारेल ते रेसकोर्स पर्यंतचा जलबोगदा २४ तासांकरीता बंद करावा लागणार आहे. त्‍यामुळे शुक्रवार, दिनांक ०७ जुलै, २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून शनिवार, दिनांक ०८ जुलै, २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुंबई शहरातील काही विभागांच्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

शुक्रवार दि.०७.०७.२०१७ रोजी सकाळी १०.०० पासून शनिवार दि.०८.०७.२०१७ रोजी सकाळी १०.०० पर्यंत खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही.
‘ए’ विभाग – कफ परेड, नरिमन पॉईंट, बॅकबे, फोर्ट, बेलार्ड पिअर, कुलाबा, मिलिटरी, नेव्‍ही,बोरीबंदर / साबुसिद्दीक क्षेत्र,
‘सी’ विभाग – बॅकबे क्षेत्र(नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, ई आणि एस रोड)
‘डी’ विभाग – लिटिल गिब्ज रोड, रिज रोड, पेडर रोड, भुलाभाई देसाई मार्ग, नेपियन्सी रोड,कारमायकल / अल्टामाऊंट रोड, ताडदेव क्षेत्र (तुलसीवाडी, आर्थर रोड, जावजी दादाजी रोड),मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन क्षेत्र
‘जी/उत्तर’ विभाग – सिटी सप्लाय क्षेत्र (एस.एल. रहेजा रोड, मोदी रोड, एल.जे. रोड,एस.व्ही.एस. रोड, टि.एच.कटारीया रोड, बाळ गोविंददास रोड, रानडे रोड, सेनापती बापटमार्ग, गोखले रोड, एन.सी.केळकर रोड, एस.के.बोले रोड, भवानी शंकर रोड, काकासाहेबगाडगीळ मार्ग)
‘जी/दक्षिण’ विभाग – (पूर्णतः) सिटी सप्लाय क्षेत्र (बी.डी.डी. चाळ एन.एम.जोशी मार्ग,ए.बी. रोड, सेनापती बापट रोड, एस.व्ही.एस. रोड, गणपतराव कदम मार्ग, पांडुरंग बुधकररोड, वरळी कोळीवाडा), सखुबाई मोहिते मार्ग, बुध्द टेम्पल, अहुजा सप्लाय आणि ९००मि.मी. व्यासाचा वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र (वरळी येथील बी.डी.डी. चाळी)
‘एच/पश्चिम’ विभाग – पेरी रोड, चॅपल रोड, बी.जे.रोड, खारदांडा, आंबेडकर रोड, माऊंट मेरी,पाली माला रोड आणि युनियन पार्क क्षेत्र
‘ई’ विभाग – नायर आणि कस्तुरबा हॉस्पिटल या भागात दि.०७.०७.२०१७ रोजी सकाळी१०.०० पासून दि.०८.०७.२०१७ रोजी सकाळी१०.०० पर्यंत या वेळेतपाणीपुरवठा होणार नाही

शनिवार ०८.०७.२०१७सकाळी १०.०० पर्यंत खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही.
‘ए’ विभाग
– पास्ता लेन क्षेत्र,
‘सी’ विभाग – काळबादेवी क्षेत्र (काळबादेवी रोड, भुलेश्वर मार्ग, फणसवाडी, जे. एस.एस.रोड), बाबुला टँक क्षेत्र (एस.व्ही.पी.रोड, ब्रिगेडीयर उस्मान मार्ग), मुंबई सेंट्रल क्षेत्र (सरदार वल्‍लभभाई पटेल मार्ग, मौलाना आझाद रोड), आणि ठाकुरद्वार रोड क्षेत्र (कावासजी पटेलटँक रोड, कारपेंटर मार्ग)
‘डी’ विभाग – मुंबई सेंट्रल क्षेत्र (अलीभाई प्रेमजी मार्ग, आर.एस.निमकर मार्ग, पठ्ठे बापुरावमार्ग, खेतवाडी रोड), ठाकुरद्वार रोड क्षेत्र (विठ्ठलभाई पटेल रोड, खाडीलकर रोड), गिरगावक्षेत्र (गावदेवी रोड, बाबुलनाथ रोड, सिताराम पालकर मार्ग, नेताजी सुभाष रोड, डॉ.दादासाहेब भडकमकर मार्ग), एम.पी.मिल कम्पाऊन्ड, वाळकेश्वर रोड क्षेत्र (बाणगंगा रोड),सिरी रोड, फॉर्जेट हिल रोड, फॉर्जेट स्ट्रिट क्षेत्र
‘ई’ विभाग - मुंबई सेंट्रल क्षेत्र (मदनपुरा, आग्रीपाडा, केशवराव खाडे रोड, बी.जे.रोड, सांखळीरोड, साने गुरुजी मार्ग, नागपाडा)
‘जी/दक्षिण’ विभाग – क्लार्क रोड, सखुबाई मोहिते मार्ग, जिजामाता नगर, डि.सी. रोडआणि ७५० मि.मी. व्यासाची वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र
‘एच/पश्चिम’ विभाग – रिक्लमेशन, बाजार रोड, दिलीप कुमार परिमंडळ (पाली हिल,खारदांडा इत्‍यादी), कोलडोंगरी, झिकझॅक रोड क्षेत्र
बी’ विभाग – डोंगरी ‘बी’ क्षेत्र (नरसिनाथ मार्ग,अब्दुल रहमान मार्ग, युसुफ मेहेरअली रोड,नागदेवी रोड), बाबुला टँक क्षेत्र (एस.व्ही.पी.रोड, मौलाना शौकत अली रोड, मोहम्मद अलीरोड)
‘एच/पश्चिम’ विभाग – जनरल क्षेत्र

Post Bottom Ad

JPN NEWS