मुंबई, दि. 04 : इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी सन 2017-18 या वर्षासाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. 31 ऑगस्ट 2017 पर्यंत नवीन विद्यार्थ्यांसाठी तसेच 31 जुलै 2017 पर्यंत नूतनीकरण केलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर करावेत, असे अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक यांनी कळविले आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम,ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून राबविण्यात येत आहे.
सन 2017-18 मध्ये प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी केंद्र शासनाने विद्यार्थ्यांचा धर्मनिहाय कोटा जाहीर केला. यामध्ये 1,59,023 मुस्लीम,90,411 बौद्ध, 20,167 जैन, 16,394 ख्रिश्चन, 3,336 शीख, 375 पारसी असे एकूण 2,89,706 इतके विद्यार्थी आहेत.
शिष्यवृत्ती मिळविण्याकरीता खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे -
• इयत्ता 1 ली ते 10 वीच्या सर्व शासकीय/निमशासकीय/खासगी अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित, मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
• अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.
• फक्त इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही.
• पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.
• एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.
• अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा धर्म, कुटुंबाचे उत्पन्न, गुण व टक्केवारी इ. माहिती अचूक भरावी.
• धर्म, उत्पन्न, गुणपत्रक, आधारकार्ड, विद्यार्थ्यांचा फोटो, बँक पासबूकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत.
• ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
• एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थींनीसाठी राखीव आहे.
• सन 2016-17 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या/शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2017-18 करीता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
• इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP २.०) (www.scholarship.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील.
• शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक अनिवार्य आहे व तो क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी संलग्न केलेले असणे आवश्यक आहे.