बायोमॅट्रिक हजेरीविरोधात आज शिवसेनाप्रणित युनियनचे केईएममध्ये आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 March 2018

बायोमॅट्रिक हजेरीविरोधात आज शिवसेनाप्रणित युनियनचे केईएममध्ये आंदोलन


मुंबई | प्रतिनिधी - महापालिका प्रशासनाने लागू केलेल्या बायोमॅट्रीक हजेरी मुळे अनेक कामगार, कर्मचारी, परीचारीका, तंत्रज्ञ यांच्या वेतनात फार मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे बायोमॅट्रिक हजेरी पद्धतीच्या विरोधात म्युनिसिपल कामगार सेनेच्या वतीने ८ मार्चला दुपारी २ वाजता संचालक वैद्यकीय शिक्षण, के.ई.एम रूग्णालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

बायोमॅट्रिक हजेरीमुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नैमित्तीक रजा कापण्यात आल्या आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात कामगारांना कर्जबाजारी करण्याचा प्रशासनाने डाव खेळला असून कामगारांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे, या मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कामगारांचे झालेले नुकसान तातडीने भरून घेण्यासाठी म्युनिसिपल कामगार सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सर्वच संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारीका यांची झालेली वेतन कपात ७ मार्चपर्यंत तातडीने द्यावी, पालिकेतील सर्व रूग्णालये बायोमॅट्रिक प्रणालीशी लिंक न करणे, सर्व रूग्णालयींन कामगार कर्मचारी यांना २७ CL द्याव्यात,३ जानेवारीरोजी मानव संसाधन भारत सरकार यांनी जाहीर केलेल्या कामाचेतास बायोमॅट्रिक प्रणालीत घेऊनच पुढील कामाच्या तासात बदल करण्यात यावा. रात्रपाळीत १ सुट्टी द्यावी. कामगार, कर्मचारी, परिचारीका यांना कुटूंबासहित विमा योजना लागू करावी इत्यादी मागण्या या आंदोलनावेळी केल्या जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS