सायन पुल पाडण्यास तूर्तास स्थगिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 January 2024

सायन पुल पाडण्यास तूर्तास स्थगिती


मुंबई - सायन स्थानकातील ११० वर्ष जुना  पूल पाडून नव्याने त्याजागी नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल शनिवार २० जानेवारीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. मात्र पूल वाहतुकीसाठी बंद केला तर वाहतूक कोंडी झाली असती. हा पूल पाडताना नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असे आवाहन खासदार राहुल शेवाळे केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित केली जाणार आहे. यामुळे पूल पाडण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. 

सायन स्थानकावरील रोड ओव्हर ब्रीजच्या पाडकामाला तूर्तास स्थगिती देण्याची सूचना शिवसेना शेवाळे यांनी रेल्वे व मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना केली. स्थानिक जनतेचा विकासाला विरोध नाही, मात्र कोणतीही कारवाई करताना स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. या संदर्भात शेवाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिका एफ (उत्तर), जी (उत्तर) विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि पुल विभाग, तसेच वाहतूक पोलीस विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी आणि धारावीतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर रोड ओव्हर पूल पाडण्यास तूर्तास स्थगिती दिली असून याबाबत लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.  

असा असेल नवीन पूल - 
नवीन उड्डाणपूल हा ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा पूल असेल.  

४९ कोटींचा खर्च - 
मध्य रेल्वेने महानगरपालिकेच्या समन्वयाने सायन रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पुलाचे पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्वे २३ कोटी रुपये तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS