Loksabha Election - अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात महायुतीकडून गोविंदा? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Loksabha Election - अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात महायुतीकडून गोविंदा?

Share This


मुंबई - मुंबईमधील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ यावेळी चांगलाच चर्चेत आला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने देखील तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. मुलाविरुद्ध वडील गजानन कीर्तिकर यांनाच उमेदवारी देण्याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होता. मात्र, गजानन कीर्तिकर यांचे वय पाहता आता अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. यातच आता अभिनेता गोंिवदा आहूजा यांचे नाव समोर आले आहे.

अभिनेता गोविंदा आहूजा यांनी याआधी देखील निवडणूक लढवली आहे. अभिनयाबरोबरच राजकारणात देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे अमोल किर्तिकर यांच्या विरोधात आता गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार देण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित ही नावे देखील चर्चेत होती. मात्र, या तिन्ही अभिनेत्यांनी उमेदवारी बाबत प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता गोविंदा आहूजा या पर्यायी उमेदवाराचे नाव चर्चेत आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages