जानेवारीत 16 दिवस बँका बंद राहतील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जानेवारीत 16 दिवस बँका बंद राहतील

Share This


अनेकदा लोक कोणतीही शहानिशा न करता बँकेत पोहोचतात, आणि बँक बंद असल्याचे समजते. जानेवारी 2025 मध्ये मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन यासह अनेक महत्त्वपूर्ण सण, उत्सव येत आहेत. पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये देशाच्या विविध भागात 16 दिवस बँका बंद राहतील. तर एकंदरीत, जानेवारीत असे आठ दिवस असतील. जेव्हा देशभरातील बँका बंद राहतील. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे.

2024 हे वर्ष संपले असून, नवीन वर्ष 2025 सुरु झाले आहे. नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जात आहे. अशातच आता जर चालू जानेवारी महिन्यात तुमचे बँकेशी संबंधित काही काम असेल आणि ते तुम्हांला जानेवारी 2025 या महिन्यातच पूर्ण करायचे आहे, असा तुम्ही विचार करत असाल तर बँकेत जाण्यापूर्वी जानेवारी महिन्यात बॅंकांना सुट्टी असणारी यादी माहिती असणे आवश्यक आहे. कारण भारतीय रिझर्व बॅंकेने जानेवारी 2025 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यात नवीन वर्ष, गुरु गोविंद सिंग जयंती, मकर संक्रांती, विवेकानंद जयंती, प्रजासत्ताक दिन इत्यादी अनेक महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत. या सण आणि उत्सवांच्या प्रसंगी बँका बंद राहतील. आजच्या डिजिटल युगात, तुम्ही सुट्टीच्या दिवशीही बँकिंगशी संबंधित अनेक कामे ऑनलाइन करू शकतात.

बँकाच्या सुट्ट्यांची यादी - 
7 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2025- मिझोरममध्ये मिशनरी डेनिमित्त बँका बंद राहतील.
12 जानेवारी 2025- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
13 जानेवारी 2025- महिन्याचा दुसरा शनिवार आणि लोहरीमुळे बँका बंद राहतील.
14 जानेवारी 2025- मकर संक्रांती आणि रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
15 जानेवारी 2025- तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगलमुळे बँकांना सुट्टी असेल.
16 जानेवारी 2025- तुसू पुजेमुळे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँका बंद राहतील.
17 जानेवारी 2025- गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
20 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
23 जानेवारी 2025- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी 2025- हिमाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त राज्यात सुट्टी असेल.
26 जानेवारी 2025- प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
27 जानेवारी 2025- चौथा शनिवार, देशभरातील बँका बंद राहतील.
28 जानेवारी 2025- रविवार, देशभरातील बँका बंद राहतील.
31 जानेवारी 2025- मी-डॅम-मी-फीमुळे आसाममध्ये सुट्टी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages