म्हाडाच्या संक्रमण शिबिरांत बायोमेट्रिक सर्वेक्षणास प्रारंभ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाच्या संक्रमण शिबिरांत बायोमेट्रिक सर्वेक्षणास प्रारंभ

Share This


मुंबई - म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर व उपनगरांतील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणास आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. सहकार नगर चेंबूर येथील वसाहतीतील संक्रमण शिबिरातील सुमारे १९५ भाडेकरु/रहिवासी यांचे आज बायोमेट्रिक सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
 
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण ३४ ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्र. संकीर्ण १०१४/प्र.क्र. १०२ (भाग-१) / दुवपु-२दि. १३.०९.२०१९ तद्नुसार संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांचे अ, ब व क प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शासनाने बायोमेट्रिक सर्वेक्षण करून संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे वर्गीकरण करण्यासंदर्भात कळविले होते. या शासन निर्देशानुसार म्हाडामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाला रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सुद्धा सहकार नगर, चेंबुर वसहतीतील संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांच्या मागणीनुसार बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १२ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत गोरेगाव पूर्व येथील बिंबिसार नगरमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बिंबिसारनगर नंतर उर्वरित वसाहतीमधील इमारतीमध्ये राहणा-या भाडेकरु, रहिवासी यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार असून संक्रमण शिबिरातील सर्व गाळेधारक भाडेकरू, रहिवासी यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम म्हाडाने योजिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages