Mumbai News कांदिवलीत गॅस गळतीमुळे भीषण आग, सात जण गंभीर जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2025

Mumbai News कांदिवलीत गॅस गळतीमुळे भीषण आग, सात जण गंभीर जखमी


मुंबई - कांदिवली (पूर्व) येथील राम किसन मेस्त्री चाळ येथील दुकानाला सकाळी भीषण आग लागली. गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत ७ जण भाजल्याने त्यांच्यावर ईएसआयसी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. (Massive fire breaks out due to gas leak in Kandivali)

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली (पूर्व) येथील राम किसन मेस्त्री चाळ, मिलिटरी रोड, आकुर्ली क्रॉस रोड नं. ३, ईएसआयसी रुग्णालयाशेजारील दुकानात आज सकाळी भीषण आग लागली. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०५ वाजता नोंदवण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. ९.३३ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. आग लागलेल्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, खाद्यपदार्थ, गॅस सिलेंडर, गॅस रेग्युलेटर व गॅस शेगडी जळून खाक झाली.

सिलेंडरमधून गॅस लीक झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. या दुर्घटनेत एकूण ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर बीडीबीए रुग्णालयात डॉ. विलास टक्के यांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ईएसआयसी रुग्णालयात दाखल जखमी :
1 शिवानी गांधी (महिला, ५१) – ७०% भाजल्या

2 नीतू गुप्ता (महिला, ३१) – ८०% भाजल्या

3 जानकी गुप्ता (महिला, ३९) – ७०% भाजल्या

4 मनाराम कुमाकत (पुरुष, ५५) – ४०% भाजले

बीडीबीए रुग्णालयात दाखल जखमी :
1 रक्षा जोशी (महिला, ४७) – ८५-९०% भाजल्या

2 दुर्गा गुप्ता (महिला, ३०) – ८५-९०% भाजल्या

3 पुनम (महिला, २८) – ९०% भाजल्या

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS