मंगळुरू येथील USFI राष्ट्रीय फिन्स स्विमिंग स्पर्धेत पेनच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2025

मंगळुरू येथील USFI राष्ट्रीय फिन्स स्विमिंग स्पर्धेत पेनच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी


पेन - कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथे 19 ते 22 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या USFI राष्ट्रीय फिन्स स्विमिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पेन येथील जलतरणपटूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. Under Water Sports Federation of India (USFI) यांच्या मान्यतेखाली येम्मेकेरे स्विमिंग पूल येथे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत पेनच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कौशल्य सादर करत संघाचा गौरव वाढवला.

हर्ष म्हात्रे (वय 18) याने 800 मीटर बाय-फिन्स प्रकारात पाचवा, तर 400 मीटर बाय-फिन्समध्ये सहावा क्रमांक मिळवला. तसेच 50 मीटर अ‍ॅप्निया आणि 100 मीटर सरफेस मोनोफिन्स प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत त्याने प्रभावी कामगिरी केली.

सचिन शिंगरूट (वय 34) याने 200 मीटर आणि 100 मीटर बाय-फिन्स प्रकारात चौथा क्रमांक मिळवत पदकाच्या अगदी जवळ मजल मारली.

अवघ्या 9 वर्षांचा आरवी पाटील या चिमुकल्या जलतरणपटूने 50 मीटर सरफेस मोनोफिन्स प्रकारात सहावा क्रमांक पटकावला, तर 50 मीटर बाय-फिन्स प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी (Best Performance) नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हर्षित पाटील (वय 11) याने 100 मीटर आणि 200 मीटर बाय-फिन्स प्रकारात आपल्या वेगवान पोहण्याच्या शैलीने राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.

पेन येथील या जलतरणपटूंच्या यशामुळे फिन्स स्विमिंगमध्ये महाराष्ट्रासह पेण तालुक्याचा मान अभिमानाने उंचावला आहे. प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून या खेळाडूंच्या यशाचे भरभरून कौतुक होत असून, भविष्यात हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS