मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार छायाचित्रांसह अंतिम मतदार याद्या उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2026

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार छायाचित्रांसह अंतिम मतदार याद्या उपलब्ध


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रनिहाय मतदार छायाचित्रांसह अंतिम मतदार याद्या मध्‍यवर्ती निवडणूक कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सुधारित कार्यक्रम जाहीर करत महानगरपालिका निहाय मतदारयादी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार, आज मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेला एकूण २२७ प्रभागांपैकी २२६ प्रभागांची मतदान केंद्रनिहाय मतदार छायाचित्रांसह यादी प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या या अंतिम मतदार याद्या बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ पासून संबंधित मध्‍यवर्ती निवडणूक कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

महानगरपालिका प्रशासनाने नागरिक, इच्छुक उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांना संबंधित मध्‍यवर्ती निवडणूक कार्यालयातून या मतदार याद्या खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांना विशेष महत्त्व असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुकरता यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS