नायर रुग्णालयात पहिल्यांदाच HPV लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नायर रुग्णालयात पहिल्यांदाच HPV लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन

Share This

मुंबई - टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिल्यांदाच HPV लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर नायर मार्ड आणि स्वास्थिक २०२६ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.

या लसीकरण शिबिराचे उद्घाटन नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शैलेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नायर मार्ड समितीचे अभिनंदन केले.

या शिबिरात सुमारे २०० डॉक्टर, इंटर्न आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना Cervavac (HPV) लस देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडली. विशेष म्हणजे लसीकरणानंतर कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया आढळून आली नाही.

HPV विषाणूमुळे होणाऱ्या विविध कर्करोगांच्या प्रतिबंधासाठी तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

नायर मार्डचे अध्यक्ष आणि बीएमसी मार्डचे उपाध्यक्ष डॉ. दिग्विजय जाधव यांनी या उपक्रमामागील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत, भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages