वास्तुदोषामुळे शिंदेसेनेचा मुंबई महापालिकेतील कार्यालयास नकार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2026

वास्तुदोषामुळे शिंदेसेनेचा मुंबई महापालिकेतील कार्यालयास नकार


मुंबई - मुंबईचा महापौर ठरल्यानंतर आता मुंबई महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयावरून राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. पालिका प्रशासनाने काँग्रेसचे पूर्वीचे कार्यालय शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्या कार्यालयाचा दरवाजा पश्चिमेला असल्याने वास्तुदोष असल्याचे कारण देत शिंदेसेनेने हे कार्यालय स्वीकारण्यास नकार दिला आहे.

शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तळमजल्यावरील कार्यालयाशेजारीच आपल्याला कार्यालय द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने ठाकरे गटाच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसने त्या जागेसमोर आपला फलकही लावला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र शिवसेना स्थापन केल्यानंतर मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद होऊन तो मारहाणीपर्यंत पोहोचला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व पक्ष कार्यालये सील केली होती.

साडेतीन वर्षांनंतर आता महापालिकेत नगरसेवकांची पुन्हा रेलचेल सुरू होणार आहे. नियमानुसार दोन नगरसेवक निवडून आले तरी संबंधित पक्षाला कार्यालय दिले जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सपचे दोन तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आल्याने, त्यांच्यासाठी स्वतंत्र नगरसेवक कक्ष उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS