भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली, पाच जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2026

भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली, पाच जण जखमी


मुंबई - भायखळा पूर्व येथील जयकृपा टॉवर या १८ मजली इमारतीत बुधवारी (११ फेब्रुवारी २०२६) रात्री मोठी दुर्घटना घडली. लिफ्टची केबल तुटल्याने चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

ही घटना रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली. भायखळा पूर्वेतील घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ जवळ असलेल्या जयकृपा टॉवरमध्ये लिफ्ट चौथ्या मजल्यावर असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि काही क्षणांत ती वेगाने खाली कोसळली. त्या वेळी लिफ्टमध्ये पाच रहिवासी होते.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने तत्काळ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.

जखमींपैकी तिघांना सर जे. जे. रुग्णालय येथे, एकाला बालाजी रुग्णालय येथे तर आणखी एकाला जसलोक रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिका अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर इमारतीतील लिफ्टच्या देखभाल आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागांकडून पुढील तपास सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS