Matosinhosच्या महापौरांची मुंबई महापौरांशी सदिच्छा भेट; आपत्कालीन व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 February 2026

Matosinhosच्या महापौरांची मुंबई महापौरांशी सदिच्छा भेट; आपत्कालीन व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा


मुंबई - Portugalमधील Matosinhos शहराच्या महापौर लुसिया सालगुईरो यांनी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दोन्ही सागरी किनारपट्टीवरील शहरांपुढील समान समस्यांवर तसेच आपत्कालीन व्यवस्थापनातील सहकार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

माटोसिनहास हे शहरही मुंबईप्रमाणे सागरी किनाऱ्यावर वसलेले असल्याने पूरस्थिती, हवामान बदलाचे परिणाम, किनारपट्टी संरक्षण आणि नागरी व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांना दोन्ही शहरांना सामोरे जावे लागते, असे महापौर लुसिया सालगुईरो यांनी नमूद केले. त्यांच्या देशातील लोकप्रतिनिधींची निवड प्रक्रिया त्यांनी यावेळी समजावून सांगितली. तसेच मुंबईप्रमाणेच माटोसिनहासमध्येही स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान दोन्ही महापौरांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सुरू असलेल्या उपक्रमांवर तसेच भविष्यातील विकासात्मक कामांवर सविस्तर चर्चा झाली. नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम व धोरणात्मक कसे करता येईल, याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सर्व प्रकारच्या आपत्कालीन प्रसंगांमध्ये विविध यंत्रणांशी समन्वय साधून प्रभावीपणे कार्य करत असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. तसेच मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या निवड प्रक्रियेबाबत माहिती देत लोकशाही व्यवस्थेची रूपरेषा स्पष्ट केली.

यावेळी महापौर रितू तावडे यांनी लुसिया सालगुईरो यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. कार्यक्रमास आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS