मुलुंड मेट्रो दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुलुंड मेट्रो दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त

Share This

मुंबई - मुलुंड पश्चिमेत पिलर क्रमांक १९६ जवळ मेट्रो उड्डाणपुलावरील पॅरापेटचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी MMRDAने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती मेट्रो पीआययूचे संचालक बसवराज एम. भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असून, घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.

मुलुंड अग्निशमन केंद्राजवळ, बांधकामाधीन Mumbai Metro Line 4 प्रकल्पाच्या परिसरात पॅरापेटचा काही भाग कोसळून वाहनांवर आदळल्याने एकाचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत.

या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत MMRDAने मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, संस्थेच्या नुकसानभरपाई धोरणानुसार मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च MMRDAकडून पूर्णपणे उचलण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, चौकशी समितीच्या अहवालानंतर आवश्यक ती प्रशासकीय आणि तांत्रिक कारवाई केली जाईल, असेही प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर मेट्रो प्रकल्पांमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages