मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांना उमेदवारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

07 February 2026

मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांना उमेदवारी


मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवरासाठी राखीव असल्याचे जाहीर झाल्यानंतर महापौर कोण होणार याची बरीच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा महापौर पदाच्या उमेदवारीसाठी करत या प्रश्नाला पूर्ण विराम दिला आहे. तर शिवसेनेकडून संजय घाडी यांचे नाव उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. 

महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारीसाठीच्या नावांची घोषणा महायुतीच्या वतीने भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी केली. यावेळी भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, भाजप गटनेते गणेश खणकर, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना गटनेते अमेय घोले, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. येत्या ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रितू तावडे या घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. भाजपा हा सध्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असून रितू तावडे या महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या तसेच संघटनात्मक दृष्टीकोनातून मजबूत अशा उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितू तावडे म्हणाल्या, "महापौर नाही तर मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय देतात तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यासाठी मी आभारी आहे."

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक संजय घाडी यांना उपमहापौर पदाची उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे आणि हे उपमहापौरपद पुढील सव्वा वर्षासाठी असणार असल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असली तरी संख्याबळाचा विचार करता आगामी काळात ही निवडणूक बिनविरोध होऊन महायुतीच्या उमेदवरांचा विजय निश्चित मानला जात आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS