रोमानिया–मिलिसाऊटी शहराच्या महापौरांची मुंबईच्या महापौरांना सदिच्छा भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2026

रोमानिया–मिलिसाऊटी शहराच्या महापौरांची मुंबईच्या महापौरांना सदिच्छा भेट


मुंबई - रोमानियातील मिलिसाऊटी शहराचे महापौर वांगले कॅमेरे यांनी आज (२३ फेब्रुवारी २०२६) मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांची महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान दोन्ही शहरांतील शहरी विकास, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. मिलिसाऊटी शहरात राबविण्यात येणाऱ्या आधुनिक घनकचरा व्यवस्थापन पद्धतींची माहिती महापौर वांगले कॅमेरे यांनी दिली. त्यावर मुंबईत अशा अभिनव संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने परस्पर सहकार्याची गरज असल्याचे मत महापौर तावडे यांनी व्यक्त केले.

प्रारंभी, महापौर रितू तावडे यांनी वांगले कॅमेरे यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) स्वामी तसेच व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख शशी बाला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS