बेस्टच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून तृष्णा विश्वासराव यांची बिनविरोध निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2026

बेस्टच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून तृष्णा विश्वासराव यांची बिनविरोध निवड


मुंबई - २०२६-२७ या वर्षाकरिता बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या तृष्णा विश्वासराव या बिनविरोध विजयी झाल्या. बेस्ट समितीच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्याने हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

तृष्णा विश्वासराव या प्रभाग क्रमांक १८० (गणेश नगर, वडाळा, अॅटॉप हिल) येथील नगरसेविका आहेत. त्यांनी सन १९९७ ते १९९९ या कालावधीत (महापौर परिषद कार्यकाळात) बेस्ट समिती सदस्या म्हणून काम पाहिले आहे. तसेच सन २०१४ ते २०१७ दरम्यान त्या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या होत्या. सध्या त्या शिवसेना उपनेत्या म्हणून कार्यरत आहेत.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

तृष्णा विश्वासराव यांच्या निवडीबद्दल महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष व बेस्ट समितीचे पदसिद्ध सदस्य प्रभाकर शिंदे, सर्व बेस्ट समिती सदस्य तसेच डॉ. अश्विनी जोशी (महाव्यवस्थापक-अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, शहर) यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS