भाजप नगरसेविकेची ‘दादागिरी’? बोरिवलीत दुकानात घुसून तोडफोड; मंदिर वादाने प्रकरण पेटले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2026

भाजप नगरसेविकेची ‘दादागिरी’? बोरिवलीत दुकानात घुसून तोडफोड; मंदिर वादाने प्रकरण पेटले


मुंबई - मुंबईतील Borivali परिसरात भाजपच्या नगरसेविका Jigna Nikunj Shah यांच्यावर गंभीर आरोप झाले असून, एका खाजगी दुकानात घुसून तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये Jigna Nikunj Shah या काही समर्थकांसह दुकानात जबरदस्तीने प्रवेश करताना आणि आतमधील माल बाहेर फेकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, दुकानात मंदिर असल्याचा दावा केला जात असताना, चपला घालून आत प्रवेश केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, पोलिसांनी घटनास्थळी ही खाजगी मालमत्ता असल्याचे स्पष्ट करत हस्तक्षेप टाळला होता. तरीही नगरसेविकेने स्वतः कारवाई करत माल बाहेर फेकण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. त्यामुळे नगरसेविकेला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात पीडित व्यक्तीकडे संबंधित मालमत्तेचे कायदेशीर हक्क असल्याचा दावा केला जात असून, गेल्या दोन दिवसांपासून त्याला धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप समोर आला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भाजप आमदार Sanjay Upadhyay यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओ समोर येऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

नगरसेविकेचे स्पष्टीकरण -
मला स्थानिक लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मंदिर असल्याचे सांगितले. मंदिरामध्ये काही लोक धंदा करत होते. आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे काहीही उत्तरे नव्हती. आतमध्ये एक दरवाजा असून त्यात देवाची मूर्ती होती. आम्ही त्याला मंदिरात धंदा करू नको असे सांगितले मात्र त्यांनी न ऐकता आपला धंदा सुरूच ठेवला. अखेर पालिका अधिकारी आणि पोलिसांना घेऊन कारवाई केली.
- जीगना शाह 
नगरसेविका, भाजपा 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS