अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत ‘मुंबई क्लीन लीग’ची सुरुवात; स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2026

अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत ‘मुंबई क्लीन लीग’ची सुरुवात; स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई क्लीन लीग’ या स्वच्छताविषयक स्पर्धेच्या नोंदणीला आज अभिनेता पद्मश्री Akshay Kumar यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुंबई हे कोट्यवधी नागरिकांना सामावून घेणारे महानगर असून, त्याची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत असली तरी नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय स्वच्छता शक्य नाही, असेही Akshay Kumar यांनी नमूद केले.

महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार अमित साटम, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यासह आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते.

आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, मुंबईत स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय विभाग, निवासी संकुल, झोपडपट्टी परिसर, वाणिज्यिक आस्थापना, रुग्णालय, शाळा, उपाहारगृह, रस्ते, उद्याने, बाजारपेठ आदी विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांना आणि आस्थापनांना अधिकृत संकेतस्थळ किंवा क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येणार आहे. स्पर्धेतील मूल्यमापन पारदर्शक पद्धतीने ‘रिअल टाइम’मध्ये पाहता येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

या स्पर्धेत विविध गटांमध्ये लाखो रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले असून, काही गटांमध्ये प्रथम क्रमांकासाठी १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. संपूर्ण स्पर्धेचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS