कुर्ला येथील स्कायवॉक लवकरच नागरिकांच्या सेवेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2026

कुर्ला येथील स्कायवॉक लवकरच नागरिकांच्या सेवेत


मुंबई - कुर्ला (पश्चिम) येथील टॅक्सीमेन कॉलनी ते श्रीकृष्ण चौक दरम्यान सीताराम भैरू मार्गावरील स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात असून जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात हा स्कायवॉक सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पातील विविध प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांना हालचाल करावी लागली. स्कायवॉकवरील एका बाजूचा एस्केलेटर बसविण्यात आला असला तरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसऱ्या बाजूला असलेल्या एसडब्ल्यूएम चौकीमुळे एस्केलेटर उभारणीचे काम प्रलंबित आहे. याबाबत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हा स्कायवॉक सुरू झाल्यानंतर दररोज हजारो पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत स्कायवॉक अत्यंत उपयुक्त ठरणार असून पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल.

तसेच, पादचारी वाहतूक रस्त्यावरून कमी झाल्याने वाहनांच्या वाहतुकीवरील ताण कमी होऊन वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला या प्रकल्पाचा मोठा लाभ मिळणार आहे.

अनिल गलगली यांनी स्कायवॉकसह दोन्ही एस्केलेटरही लवकरात लवकर कार्यान्वित करून नागरिकांना संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS