आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी विद्यार्थिनीवर कारवाईची मागणी; शैक्षणिक नुकसान टाळून अन्यत्र प्रवेश द्यावा – किशोरी पेडणेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2026

आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी विद्यार्थिनीवर कारवाईची मागणी; शैक्षणिक नुकसान टाळून अन्यत्र प्रवेश द्यावा – किशोरी पेडणेकर


मुंबई - केईएम रुग्णालय व सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र निषेध केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली घृणास्पद, असंवेदनशील आणि समाजमनाला ठेच पोहोचवणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, अशी भूमिका महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडली.

शुक्रवारी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरिश फाटक यांची भेट घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी निवेदन सादर केले. संबंधित विद्यार्थिनीवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तिला सक्त समज देऊन केईएम व जी.एस. मेडिकल कॉलेजमधून अन्य वैद्यकीय महाविद्यालयात स्थानांतरित करण्याची मागणीही करण्यात आली.

या वक्तव्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून वैद्यकीय क्षेत्रातील मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि मानवी संवेदनशीलतेला धक्का बसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच या घटनेमुळे राज्यातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक मंचांवर बोलताना जबाबदारी आणि मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात यावीत तसेच विद्यार्थ्यांकडून जबाबदार वर्तनाबाबत लेखी हमीपत्र घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

अवयवदानासारख्या संवेदनशील विषयांवर चुकीचा संदेश देणारी वक्तव्ये समाजहिताला बाधक ठरू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, नगरसेवक सचिन पडवळ, सचिन पाटील, किरण तावडे, नगरसेविका सारीख झोरे, भारती पेडणेकर, माधुरी मांजरेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages