घाटकोपरमध्ये महापालिकेचा भाजपाशी संबंधित ३ अनधिकृत वाचनालयांवर हातोडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2026

घाटकोपरमध्ये महापालिकेचा भाजपाशी संबंधित ३ अनधिकृत वाचनालयांवर हातोडा


मुंबई, दि. ३० जून (जेपीएन न्यूज डेस्क) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाने मंगळवारी पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर परिसरात पदपथांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या ४ अनधिकृत दुकानांसह ३ अनधिकृत वाचनालयांवर निष्कासनाची कारवाई केली. स्थानिक स्तरावर ही वाचनालये भाजपाशी संबंधित असल्याची चर्चा असून, महापालिकेच्या कारवाईमुळे परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (BMC Demolishes 3 BJP-Linked Unauthorized Reading Rooms in Ghatkopar)

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त मारुती पवार यांच्या नेतृत्वाखाली (३० जून) ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या पाहणीत पंतनगर येथील संत ज्ञानेश्वर मार्गावरील पदपथ आणि रस्त्यावर उभारलेल्या अनधिकृत दुकानांमुळे तसेच वाचनालयांमुळे पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार ४ दुकाने आणि ३ वाचनालयांचे निष्कासन करण्यात आले. यावेळी अनधिकृत शेड आणि इतर बांधकामेही पाडण्यात आली.

या कारवाईनंतर पदपथ पूर्णपणे मोकळा करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध झाला आहे. कारवाईदरम्यान ‘एन’ विभागातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages